What is the purpose of your life.. ?

मित्रांनो, माय मराठी संस्थेने आजवर महिला सक्षमीकरणाचे ध्येय समोर ठेऊन अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. २००६ साली संस्था अगदी नविन असताना संस्थेने कार्यक्रमांची मुहूर्तमेढ पनवेल येथे महिलांकरिता उद्योजकता प्रेरणा अभियानाने केली होती. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून संस्थेने भारत सरकारच्या लघु उद्योग मंत्रालयाच्या मदतीने सह्याद्रीनगर, चारकोप, कांदिवली येथे ४० दिवसांचा उद्योजकता व कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केला होता. ते ४० दिवस बरेच चांगले वाईट अनुभव देऊन गेले.

दिनांक १० जुलै २०१० रोजी एक दिवसीय उद्योजकता प्रेरणा अभियान आयोजित केले होते व ४० दिवसांचा कार्यक्रम १२ जुलै २०१० पासुन सुरु होणार होता. १० तारीखेचे अभियान दुपारी २.३० ला सुरु होणार होते. दुर्दैवाने त्या दिवशी धो धो पाऊस कोसळत होता व ऎन वेळेस जागा बदलावी लागली. दुपारचे ३ वाजले तरी महिलांची उपस्थिती नगन्य होती, शेवटी संस्थेचे कार्यकर्ते अक्षरश: पावसात भिजत चारकोप परिसरात फिरले व उपस्तथिती साधली. दुपारी २.३० ला सुरु होणारा कार्यक्रम ४.०० ला सुरु झाला. मात्र या प्रेरणा कार्यक्रमामुळे चांगला प्रभाव पडला व ४० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी लागणारी उपस्थिती गोळा झाली.

कार्यक्रमात, एकूण २५ महिलांना घेण्याची ताकीद मंत्रालयातुल आली असताना देखील उपस्थित महिलांच्या विनंतीला मान देऊन ३६ महिलांना प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यात आले. दिनांक १२ जुलै २०१० पासुन ४० दिवसांचे प्रशिक्षण सुरु झाले. सर्व महिलावर्ग उपस्थित होता, व शासकीय सोपस्कार संपवून महिलांसोबत चर्चा सुरु झाली. सर्व महिला २५ ते ४५ या वयोगटातील होत्या, व आपल्याला व्यवसाय सुरु करता नाही आला तरी निदान आपण नवीन काहीतरी शिकू अशा चूकीच्या समजूतीने आल्या होत्या. मराठी माणूस हा उद्योगापासून दुर का रहातो ते त्या दिवशी प्रकर्षाने जाणिले, उद्योग व्यवसाय हे आपले मुळी क्षेत्रच नाही अशी मनाशी समजूज जणू बहुतांश मराठी समाजाने घालून घेतलीय.

माझा सर्वात पहिला प्रश्न एकच होता. “what is the purpose of your life.. ?” महिलांना इतकेच विचारले की तुमच्या जगण्याचे उद्देश काय हा प्रश्न तुम्ही तुम्हाला विचारा, फक्त मुलगी, पत्नी किंवा आई सासू हेच तुमचे जगणे असणार आहे का ? तुम्हाला स्वावलंबी व्हावेसे वाटत नाही का ?

माझे हे लेक्चर सुरु असताना एक महिला शेवटच्या रांगेत डोळे मिटून जवळजवळ गाढ झोपलेली दिसली, तिला हाक मारली तेव्हा ती दचकून जागी झाली..

एक गोष्ट तेव्हा जाणविली, की महिलांमध्ये आत्मविश्वासांची प्रचंड कमतरता आहे. त्यानंतर सलग दोन तीन दिवस motivation व self belief वर त्यांना मार्गदर्शन देण्यात आले. हळू हळू महिलांमध्ये आत्मविश्वास येत गेला, वर्गात महिलांचा आवाज येऊ लागला, समोरुन प्रश्न येऊ लागले. नंतरचे काही दिवस थिअरीचे विषय घेण्यात आले, महिलांना शासकीय योजना, कर्ज योजना, प्रकल्प अहवाल बनविने, मार्केट सर्व्हे, बुक किपींग व अकाऊंट्स, मार्केटिंग व सेल्समेनशिप आदि विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले.

पुढील ३० दिवसांत महिलांना विविध केमिकल प्रोडक्ट्स जसे फिनाईल, परफ्यूम्स, अगरबत्ती, धूप, लिक्वीड सोप, हर्बल शांपू आदी ८ वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. इथे एक गोष्ट कबूल करायला पाहिजे, कदाचित पहिल्या दिवशी “what is the purpose of your life..? हा प्रश्न महिलांनी खूप गंभीरपणे घेतला असावा, कारण त्यांनीदेखील जीव ऒतून परिश्रम घेतले, जितकी माहिती गोळा करता येईल तितकी गोळा केली. कधी प्रशिक्षक उशिरा आले तर महिला स्वत: वर्गात उभ्या राहून आपले वकृत्व सुधरण्याचे प्रयत्न करायच्या. बघता बघता दिनांक २१/०८/२०१० रोजी कार्यक्रमाची सांगता होणार होती. अनेक मान्यवर या कार्यक्रमास येणार होते.

महिलांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या व संपूर्ण कार्यक्रमास एखाद्या उत्सवाचे रुप आणले. जेव्हा मी महिलांना कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा २५ महिलांपैकी १० महिला मंचावर आल्या व आपल्या भावना व्यक्त केल्या, कुणीही काहीही लिहून आणले नव्हते, सर्व उत्स्फूर्त होते, सर्व मनातून आले होते. किती प्रचंड बदल होता हा. ज्या महिला पहिल्या दिवशी आपले नाव सांगायला घाबरत होत्या, त्याच आज स्टेज व येऊन आपले मनोगत व्यत करित होत्या. वेळे अभावी इतर १५ महिलांना बोलायची संधी मिळाली नाही म्हणून त्या हिरमूसलया होत्या

या भाषण करणा-या महिलांमध्ये ती महिला होती. जी पहिल्या दिवशी दुलकी काढत होती. स्टेज वर येऊन तिने प्रांजळ प्रतिक्रिया दिली की भाषण करण्याची ही तिची पहिलीच वेळ. बोलता बोलता ती महिला एक अप्रतिम वाक्य बोलून गेली ज्यात तिचा आत्मविश्वास ओसांडून वाह्त होता. ती म्हणाली, माझे माहेरचे आडनाव भोसले होते, नवरा व मुलं नेहमी चिडवायची, तुझे आडनाव फक्त भोसले, कर्तबगारी काय?. ती महिला म्हणाली मी आता त्यांना सिध्द करुन दाखवेन मी देखील काहीतरी करु शकते. गेले ४० दिवस केलेल्या कष्टाची ही पोचपावतीच होती.
याच कार्यक्रमात १३ महिलांनी एक बचत गट सुरु केला व ब-याच महिलांनी आपले छोटे व्यवसाय सुरु केले होते. मराठी माणुस व्यवसाय करु शकत नाही हा समज चुकीचा ठरवलेला या तरुण

उद्योगणींनी. संस्थेमुळे किंवा शासकीय सेवेत असल्या मुळ या पुर्वी देखील मी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम पाहिले, केले, मात्र हा असा ग्रुप पुन्हा न लाभणे !! कधी कधी आपण सहजच बोलून जातो, मात्र आपल्या शब्दांचा किती दुरगामी प्रभाव दुस-या व्यक्तीवर होऊ शकतो हे या प्रशिक्षण कार्यक्रमात जाणविले.

Advertisements

Published by

Vijay

To know more about me please to visit About Me page on my blog at www.vijaynjoshi.weebly.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s